
८ वर्षे वापरलेल्या एसटीच्या गाड्यांना मुंबईत प्रवेश नाही म्हणून अशा गाड्या रत्नागिरीकरांच्या माथी
रत्नागिरी एस.टी. महामंडळाच्या मुंबई विभागात आठ वर्षे प्रवासी सेवेत धावलेल्या ३५ लालपरींची खेडोपाड्यात पाठवणी करण्यात आली आहे. आठ वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या गाड्यांना मुंबईत प्रवेश नाही. या धोरणाला अनुसरून मुंबई महानगरातील एस्टीच्या पाच आगारांतील जुन्या गाड्यांची गाबी रवानगी करण्यात आली आहे. या गाड्या २५ वर्षांची वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत मुंबई महानगराच्या वेशीबाहेर प्रवासी सेवेत अविरत धावणार आहेत. यामध्ये रत्नागिरीला ५ गाड्या देण्यात आल्या आहेत.
प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने देशातील प्रमुख महानगरांत आठ वर्षांच्या जुन्या गाड्यांच्या वाहतुकीला मनाई आहे. हे धोरण इतर वाहनांप्रमाणे महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या एस्टी महामंडळालाही बंधनकारक आहे. त्याला अनुसरून महामंडळाने मुंबई विभागातून जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान एकूण ३५ एसटी गाड्यांची गावी रवानगी केली आहे. या गाड्यांनी मागील आठ वर्षे मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ, पनवेल आणि उरण आगारांतर्गत प्रवासी सेवा दिली. परिवहन मंत्रालयाच्या धोरणाला अनुसरून जुन्या गाड्यांना मुंबई महानगराची हद्द कायमची सोडावी लागली आहे.
www.konkantoday.com



