
पत्नी ओरडल्याच्या रागातून वृद्धाची आत्महत्या
दारूच्या नशेत पत्नीशी वाद झाल्यानंतर एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (१५ डिसेंबर) पावस (ता. रत्नागिरी) येथील सामंतवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक रामचंद्र वारीसे (वय ६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना दारूचे व्यसन होते. सोमवारी रात्री ते दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीशी वाद झाला. त्यानंतर ते आपल्या खोलीत गेले. बराच वेळ बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.




