
रत्नागिरीतील १३ वर्षीय सृजन सतीश पटवर्धन याने लिंगाणा सुळका यशस्वीपणे सर केला
लिंगाणा सुळका सर करणे, हे प्रत्येक गिर्यारोहकाचे एक स्वप्न असते. ’जिद्दी माउंटेनिअरिंग’ या अनुभवी संघाच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील १३ वर्षीय सृजन सतीश पटवर्धन याने लिंगाणा सुळका यशस्वीपणे सर केला. सृजन हा रत्नागिरीतील दामले हायस्कूलचा विद्यार्थी असून एवढ्या कमी वयात त्याने केलेली ही कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
अनेक वर्षे मनात जपलेले हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची इच्छा प्रत्येक दुर्गभटक्या व गिर्यारोहकाच्या मनात असते. लिंगाणा किल्ला पाहण्यासाठी गिर्यारोहणाची जोखीम पत्करणे अपरिहार्य ठरते व त्याचबरोबर लिंगाणा ळक्याचे आव्हानही स्वीकारावे लागते. अशाच या कठीण व धाडसी आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जात रत्नागिरीतील १३ वर्षीय सृजन पटवर्धन याने लिंगाणा सुळका यशस्वीपणे सर केला.. वर्षाच्या शेवटी ही मोहीम ’जिद्दी माउंटेनिअरिंग’ या अनुभवी संघाच्या नेतृत्वाखाली पार पडली. जिद्दी माउंटेनिरिंग संस्था माउंटेनिरिंगचा प्रसार व प्रचार करून साहसी मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण करणारी महाराष्ट्रातील महत्वाची संस्था आहे. या आधी त्याने वजीर, सुळ्या, भांबुर्डे नवरा, नवरी, करवली या सुळक्यांवर यशस्वी आरोहण केले.www.konkantoday.com




