
कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनसह संपूर्ण पॅकेज न दिल्यास प्रजासत्ताक दिनी जीवन समर्पण
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत मौजे कोळकेवाडी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र आजतागायत संबंधित कुटुंबांना पर्यायी जमीन देण्यात आलेली नसून, शासनाकडून मिळणारे सर्व मोबदले व संपूर्ण पुनर्वसन पॅकेजही अपूर्ण असल्याचा गंभीर आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनसह संपूर्ण पॅकेज न दिल्यास प्रजासत्ताक दिनी जीवन समर्पित्त करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त व सामाजिक कार्यकर्ते दीपक भिकाजी मोहिते यांनी राज्य सरकारला दिला आहे. या संदर्भात कोयना प्रकल्पग्रस्त दीपक मोहिते (रा. चाकाळे, कोळकेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. यापूर्वी दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजीही त्यांनी याबाबत निवेदन दिले होते; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. श्री. मोहिते यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते एक सामान्य नागरिक, मतदार तसेच कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत.
www.konkantoday.com




