
गुहागर तालुक्यातील खाडी किनारील गावामध्ये गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
गुहागर तालुक्यातील खाडी किनारील गावामध्ये पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला गुहागर येथे दहावीच्या क्लास आहेत असे सांगून गावातीलच तरुणाने गुंगीचे औषध देऊन १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे.
सदरील मुलीचे या तरुणासोबत प्रेम होते. मुलगी तरुणासोबत गुहागर समुद्रावर फिरण्यास गेली होती. त्यानंतर शृंगारतळी येथे पिक्चर पाहूया असे सांगून दोघेही शृंगारतळीला आले. मात्र टॉकीज बंद असल्याने पुन्हा गुहागर समुद्रकिनारी सुरूच्या बनात गेले. त्या ठिकाणी त्या मुलाने या अल्पवयीन मुलीला गुंगीचा औषध देऊन संध्याकाळपर्यंत अतिप्रसंग केले. त्यानंतर गुहागरमधील एका नामांकित लॉज वरती रात्रभर राहिले. त्या ठिकाणीही गुंगीचे औषध देऊन त्या मुलाने तिच्यावर अतिप्रसंग केला व सकाळी तीला घरपोच केले. तोपर्यंत तिचे पालक व वाडीतील इतर मंडळी तिचा शोध घेत होते. पहाटे तीन वाजेपर्यंत तिचा शोध घेतला व सकाळी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल केली.
गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग त्यानंतर घरातून मुलगी घरी आल्याचा फोन आला. पालक सर्व घरी जाऊन त्या मुलीला ताब्यात घेतले व संपूर्ण हकीगत त्या मुलीकडून विचारून घेतली. त्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन या पिडीत मुलीने या तरुणांविरोधात गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली.www.konkantoday.com




