
गुणदेत ओल्या कचर्यापासून घरगुती कंपोस्ट खत निर्मिती, ग्रामपंचायतीचा स्तूत्य उपक्रम
खेड तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायत हद्दीत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ओल्या कचर्यापासून घरगुती कंपोस्ट खत निर्मितीवर ग्रामस्थांनी भर दिला आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना प्रोत्साहित केले जात असून सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच रुणाली आंब्रे, ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यावरही भर दिला. ग्रामस्थांकडून मिळणार्या सकारात्मक प्रतिसादामुळे अभियान यशस्वी – होण्यास मदत होत आहे. ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने विशेष पाऊल पुढे टाकले आहेत. ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.www.konkantoday.com




