
ख्रिसमससह नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर-ठोकूर स्पेशलच्या धावणार ४ फेर्या
ख्रिसमससह नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर डॉ. आंबेडकर नगर-ठोकूर स्पेशलच्या ४ फेर्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. या स्पेशलचे १४ डिसेंबरपासून आरक्षण खुले होणार आहे. ०९३०४/०९३०३ क्रमांकाची डॉ. आंबेडकर – नगर-ठोकूर स्पेशल २१ व २८ डिसेंबर रोजी धावेल. – डॉ. आबेडकरनगर येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून तिसर्या दिवशी पहाटे ३ वाजता ठोकूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात २३ व ३० डिसेंबर रोजी धावणारी स्पेशल ठोकूर येथून पहाटे ४.४५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सायंकाळी ३.३० वा. डॉ. आंबेडकर नगर येथे पोहचेल. वसई मार्गे धावणार्या २२ एलएचबी डब्यांच्या स्पेशलला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, मडगाव आदी स्थानकांवर थांबे आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com




