
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची रुग्णालयात जाऊन भेट
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांकडून उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली.
अलीकडेच तब्येतीत बिघाड झाल्याने उदय सामंत यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या असून उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.




