गावखडीतील श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रविकिरण तोडणकर यांची निवड

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाची सभा नुकतीच उत्साहात झाली. यात रविकिरण धर्माजी तोडणकर यांची श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी, उपाध्यक्ष पदी उदयराज भाटकर यांची निवड करण्यात आली आहे.
उदयराज भाटकर यांनी गेली तीन वर्षे मंडळाचा अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे.
तसेच मंडळाच्या सचिवपदी दिलीप पाटील, सहसचिव महेश सुतार, कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, खजिनदार रत्नाकर भोसले, सहखजिनदार रमाकांत पांचाळ, क्रीडाप्रमुख प्रणव तोडणकर, उप क्रीडाप्रमुख गणेश तोडणकर यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीचे गावखडी पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button