
रत्नागिरी रब्बी फळपीक विमा मुदतवाढ मिळावी, माजी आमदार डॉ. विनय नातू यांची मागणी
रब्बी हंगाम सन २०२५-२६ करिता केंद्र शासनाने पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागासाठी देय मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवल्याचे जाहीर केले आहे. मात्र यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला वगळण्यात आले असल्याने जिल्ह्यासाठीही फळपीक विमा योजना मुदतवाढ लागू करावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने पुर्नरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागासाठी देय मुदत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. परंतु भारतीय कृषी विमा कंपनीने काही जिल्ह्यांमध्ये मुदतवाढ अंमलात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रत्नागिरीचाही समावेश आहे.www.konkantoday.com




