
राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाच्या एअरबड्स चार्जिंग बॉक्सची चोरी
राजधानी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२४३१) मध्ये प्रवाशाच्या सामानाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक धरमपाल सिंग चौधरी हे त्यांच्या वन प्लस नॉर्ड कंपनीच्या इअरबड्सचा रिकामा चार्जिंग बॉक्स चार्जिंगला लावून जेवणासाठी गेले असता, अज्ञात आरोपीने संधी साधून बॉक्स चारून नेल्याची तक्रार नोंदवण्यात आला आहे.
जेवण करून हात धुण्यासाठी काही वेळ बाहेर गेलेल्या चौधरी यांनी परत सीटवर आल्यानंतर चार्जिंग पॉईंटवरील बॉक्स गायब असल्याचे आढळले. आसपासच्या प्रवाशांना विचारणा करूनही व कोचमधील कर्मचार्यांना विचारल्यावरही कुणीही माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने हातसफाई केल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली.
www.konkantoday.com




