कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन च्या तिसऱ्या पर्वामधे सर्व धावपटू धावणार मराठी भाषेसाठीजगातली कुठल्याही भाषेसाठी समर्पित पहिली अर्ध मॅरेथॉन

४ जानेवारी २०२६ रोजी दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरी धावनगरी होणार आहे.

जवळपास ३००+ शहरांमधून ,१२ राज्यांमधुन २२००+ फिटनेस टुरिस्ट रत्नागिरी मध्ये कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन च्या माध्यमातून येत आहेत
कोकण वासियांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली असं जिचं वर्णन केलं जात त्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन च्या यशस्वीतेसाठी सर्व कोकणवासीय सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून झटून कामाला लागले आहेत.
२० डिसेंबर ही या मॅरेथॉन साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे असे आज हॉटेल सी फॅन्स इथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले गेले.

आजपर्यंत जगामध्ये कुठलीही अर्ध मॅरेथॉन कुठल्याही भाषेसाठी सर्पित केली गेली नाहीये आणि हे शिवधनुष्य कोकणवासीय सुवर्णसूर्य फाउंडेशन च्या माध्यमातून पेलत आहेत . मॅरेथॉन दरम्यान जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केलेला असेल आणि जिथे अत्यावश्यक आहे तिथेच इंग्रजी भाषा असेल असं यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले

संपूर्ण महाराष्ट्रात फिरून २५ पेक्षा जास्त जिल्ह्यामधील अनेक धावपटूना भेटून या उपक्रमाची माहिती दिली गेली आहे . या निमित्ताने ३० दिवसात जवळपास ४००० किमी प्रवास कोकण कोस्टल टीम ने केला.

मुंबई रोड रनर्स या संस्थे च्या माध्यमातून प्रत्येक मॅरेथॉन चे ऑडीट होते आणि मॅरेथॉन ला रेटिंग दिले जाते त्या रेटिंग मध्ये आपली कोकणवासीयांची मॅरेथॉन १ नंबर वर आहे हे अभिमानाने सांगितले गेले

सन्मानीय उद्योगमंत्री ,मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांनी हे या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत.

बँक ऑफ इंडिया , ऍड प्लस H२O पार्टनर, सोर्जेन सॉक्स, एनर्जाल, जोशी फूड्स, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशन हे देखील या उपक्रमाचे विशेष प्रायोजक आहेत.

सादर उपक्रमामध्ये भारताबाहेर राहणारे धावपटू आभासी पद्धतीने सहभागी होतील अशी माहिती यावेळी दिली गेली. आर्यक सोल्युशन्स या आयटी कंपनी च्या माध्यमातून यासाठी विशेष ऍप बनवण्यात येत आहे याची माहिती यावेळी आर्यक सोल्युशन्स च्या प्रशांत आचार्य यांनी दिली

२१ किमी चा एक दिशा मार्ग, आंब्याच्या आकाराचे मेडल, समुद्र किनारी सांगता, ९ गावांमधून जाणारा जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग आणि समुद्र किनारी मिळणारा उकडीचा मोदक हे या उपक्रमाला सर्वांपेक्षा वेगळं बनवतात आणि यामुळेच ही कोकणवासीयांची मॅरेथॉन लोकप्रिय होते आहे. दरवर्षीप्रमाणे अंकिता पाटकर आणि त्यांची झुंबा टीम या मॅरेथॉन आधी झुंबा सेशन घेणार आहे आयपॉपस्टार फेम राधिका भिडे हिने या मॅरेथॉन चे गाणे कंपोज केले आहे

सुवर्णसूर्य फाउंडेशन व्हिजन २०४७ वर काम करत आहे. पुढील २२ वर्षात १ कोटी फिटनेस टुरिस्ट कोकणामध्ये फाउंडेशन च्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आले पाहिजेत किमान २००० रुपये त्यांनी खर्च केला पाहिजे जेणेकरून कोकणाची उलाढाल २००० कोटी ने वाढेल हे व्हिजन यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यांनी पत्रकारांसमोर मांडले.

रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन च्या मान्यतेने होणाऱ्या या उपक्रमाविषयी ऍथलेटिकस असोसिएशन चे संदीप तावडे यांनी पत्रकारपरिषदेदरम्यान विशेष समाधान व्यक्त केले. ज्या हेतूने ही मॅरेथॉन घेतली जाते तो हेतू अतिशय प्रामाणिक असतो असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेचे आयोजक असलेल्या सुवर्णसूर्य फाउंडेशन चे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यावर्षी अतिशय खडतर समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन आफ्रिके मध्ये सलग ११ तास ३४ मिनिटे धावून पूर्ण करून आले. त्यावेळचा अनुभव सांगताना देवस्थळी म्हणाले की २२,००० सहभागी धावपटूंपैकी १७,००० जण हे आफ्रिकेमधलेच होते . थोडक्यात स्थानिकांचा मोठा सहभाग कुठल्याही स्पर्धेला जास्त मोठा बनवतो आणि म्हणून सर्व पत्रकारबंधूं आणि भगिनींच्या माध्यमातून सर्व रत्नागिरी आणि कोकणवासियांनी या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले गेले.
स्थानिकांना ऑफलाईन नोंदणीची सुविधा देखील आनंद सागर अपार्टमेंट मजगाव रोड इथे असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन ऑफिस मध्ये करण्यात आली आहे.

सदर पत्रकारपरिषदेसाठी
ऍथलेटिक्स असोसिएशन चे संदीपजी तावडे, मैत्री ग्रुप चे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब चे अध्यक्ष श्री महेश सावंत, ऍडव्होकेट सचिन नाचणकर, आर्यक सोल्युशन्स चे प्रशांत आचार्य , डॉक्टर राज कवडे आणि सुवर्णसूर्य फाउंडेशन चे श्री प्रसाद देवस्थळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button