
केंद्र सरकार अतिरिक्त कर लादणार असल्याने पानमसाला, सिगारेट आणखी महागणार
केंद्र सरकार आता सिगारेट आणि पान मसाला सारख्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लादणार आहे. या अतिरिक्त करातून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. आरोग्य सुरक्षेशी संबंधित विधेयक असलेले राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर झाले. आता ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. सदर विधेयकांना सर्व पातळीवर मंजुरी मिळाल्यानंतर सिगारेट, पानमसाला सारख्या वस्तू अधिक महाग होतील. ४० टक्के जीएसटी व्यतिरिक्त पान मसाला वस्तूंवर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर देखील लावला जाणार असल्यामुळे सदर वस्तू आणखी महाग होणार आहेत.
www.konkantoday.com




