
सातार्यात खैर तोड, चिपळूणच्या ११ जणांविरुद्ध गुन्हा
खैर वृक्षाची तोड करून वाहतूक केल्याप्रकरणी पाटण वनविभागाकडून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडून चारचाकी महिंद्रा पिकअप व टाटा मॅजिक या २ गाड्यांसह विनापरवाना तोड केलेला खैर सोलीव लाकूड माल एकूण ४९ नग (०.४२५ घनमीटर) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लाकूड तोड करणार्याचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पाटण वन विभागाने दिलेली माहिती अशी, मंगळवार २. रोजी वनपरिक्षेत्र पाटणमधील मौजे मिरासवाडी येथील शिरळ-मिरासवाडी रस्त्याच्याकडेस बेकायदेशीरपणे खैर वृक्षांची तोड करून त्यापासून खैर सोलीव ४९ नग (०.४२५ घमी) विनापरवाना वाहतूक करत असताना पाटण वनविभागास सापडले. यावेळी वनविभागाने वाहनांवर कारवाई करून ११ संशयित आरोपींवर वनगुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत जुनेद तन्वीर डांगे, संजय रामचंद्र पवार, गणेश नारायण पंडव (सर्व रा. पोफळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), रवींद्र गोपाळ कदम, विजय कोंडीबा माने, अनिल कोंडीबा खरात, कोंडीबा भागोजी ढेबे, जनार्दन भागोजी ढेबे, जानू भागोजी ढेबे, बाब सोनू ढेबे (सर्व रा. पेढांबे, ता. चिपळूण), मनोहर दत्ताराम साबळे (रा. दळवटणे, ता. चिपळूण) अशा ११ जणांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वनगुन्हयासाठी १ वर्ष कारावास किंवा ५ रुपयांपर्यंतचा द्रव्य दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तदतूद कायद्यात आहे.www.konkantoday.com




