नेपाळ येथून नि ११० महिला पुरुष प्रवाशांना घेऊननिघालेली खाजगी बस वाहन चालकाचा ताबा सुटल्यानेचआंबा घाटात दरीत कोसळली सर्वजण नेपाळी कामगार व त्यांचे कुटुंबीय


रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्री वळणा जवळील दरीत खाजगी प्रवासी बस कोसळल्याने आज पहाटे अपघात झाला होता यामध्ये ३७ प्रवासी जखमी तर आठ प्रवासी गंभीर जखमीझाले आहेत हे सर्व नेपाळी कामगार असून ते कुटुंबासह येत होते ही घटना सकाळी अंदाजे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली
१ डिसेंबर २०२५ रोजी नेपाळ येथून नि ११० महिला पुरुष प्रवाशांना घेऊन खाजगी बस एम पी १३ पी १३७१ निघाली होती आज पहाटे आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुमारे पन्नास फूट दरीत कोसळली झालेल्या अपघातात ३७ प्रवासी जखमी झाले असून त्यातील आठ जण जखमी आहेत सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने एकदम दरीत कोसळली नाही अपघाताची वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम व देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे व साखरपा पोलीस कर्मचारी यांनी तातडीने अपघात झाल्या ठिकाणी धाव घेऊन जखमीना बाहेर काढले व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे उपचारासाठी आणले त्यात ३७ प्रवासी जखमी झाले असून आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत सर्व जखमीना रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहेत
यावेळी साखरपा देवरुख आंबा मलकापूर नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले यामध्ये लहान मुलांचा देखील यात समावेश आहे
अपघाताचे गांभीर्य ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिक मेनकर डॉ सृष्टी डोर्ले १०८ च्या डॉ डॉ रुपाली माने कर्मचारी भारती गुरव सुप्रिया गावडे निवास मुंडे प्रसाद पाटील तसेच चालक महेश रेडीज मंदार शिंदे रामदास मुकनर वैभव आंबवकर शिपाई विष्णू खामकर विकास कदम यांनी तत्काळ जखमी रुग्णांना उपचारासाठी मदत केली

यामध्ये डेलीयन चौधरी वय २८ सुनील चौधरी वय ३१ खुशीराम वय ३९ जीवन परिवार २० नीरजल २४देबा बी के ६० गिरसिंग धामी ५० मुलयम सिंग ३३ देवमा धामी ४८ जसबीर थापा ४७ चंपा थापा ४७ इकमन नेपाली २२ वीर बहाद्दूर मगर ४4 दमर ठाकूर ३९ वीरेंद्र सिंग तोमर ४८ तोयनाथ खामे ४5 सहनील दीड वर्ष गीता मगर ५० ग्यानबार मगर ५२ बीर बहादूर मगर ६७शेर सारथी ५०बांडू ठारू ७० तेज ठाकूर ५२ भागीराम चौधरी ३६ किशोर ठारू ३५ राम बहादूर ७५ ईश्वर चौधरी ४० नारायण गिरी ६० काळसु चौधरी ५५ असे जखमी झालेल्यांची नावे असून आठ जखमींची नावे समजू शकली नाहीतयावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम पोलीस निरीक्षक उदय झावरे देवरुख व साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्य्क पोलीस फौंजदार शांतातम पंदेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल दळवी नितीन पवार स्वप्नील कांबळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर कॉन्स्टेबल रेणुका कांबळे रेश्मा चव्हाण, पोलीस पाटील रवींद्र फोंडे आदिनी घटनास्थळी जाऊ न जखमीना मदत करून सुखरूप बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यास मोलाचे सहकार्य केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button