
रेल्वेत अलार्म साखळी खेचणार्या ३१ जणांना अटक
खेड कोकण मार्गावरून धावणार्या माटणा-वास्को एक्स्प्रेसमध्ये बेकायदेशीरपणे अल्पर्म साखळी खेचणार्या एका नेत्यासह ३ जणांना आरसीएसच्या पथकान अटक केली ही घटना १ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मडगाव आणि थिविम स्थानकादरम्यान घडली होती. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांना मडगाव येथे जेएमएफसीसमोर हजर करण्यात आले असता नेत्यांसह अन् संशयितांना दंडासह शिक्षा सुनावली.
रेल्वेगाड्यांतील धोक्याच्या साखळीचा अनधिकृतरित्या वापर करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेच्या आरसीएफ पथकाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. १२७४२ क्रमांकाच्या पाटणा-वास्को एक्स्प्रेसमध्ये तपासणी दरम्यान रेल्वेतील साखळीचा बेकायदेशीर वापर केला. या प्रकारानंतर करमाळी स्थानकाच्या बाहय सिग्नलवर एसीपीसह प्रवासी अनधिकृतपणे खाली उतरले, यादरम्यान रेल्वेच्या १५ अधिकारी व कर्मचार्यांसह आरसीएफच्या पथकाने एसीपी करणार्या त्याच्या नेत्यासह ३१ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम १४१, १४५, १४७ अंतर्गत केलेल्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. मडगाव जेएमएफसीने नेत्याला ११०० रुपये दंड, उर्वरित गुन्हेगारांना ६०० रुपये दंड आणि टीआरसीने तीन दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.www.konkantoday.com




