
बाळ दाते यांना शासनाचा युवा पुरस्कार
राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपुत्र व राजापूर हायस्कूलचे शिक्षक उमाशंकर दाते यांच्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून, सांस्कृतिक विभागाकडून उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
आजपर्यंत नाक संस्थाकडून बाळ दाते यांना सन्मानित करण्यात आले आहे, दाते यांच्या कामाची दखल अमेरिकेत ही घेतली गली आहे, गावात राहून संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे, यासाठी अपार कष्ट, जिज्ञासू वृत्ती आणि सातत्य या गुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दाते यानी तयार केलेले ऑर्गन भा रतात तसेच परदेशातही गेले आहेत.www.konkantoday.com




