
तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत-मंत्री नितेश राणे
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. याप्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहेयाशिवाय अनेक राजकीय मंडळी, मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी वृक्ष तोडीला विरोध दर्शवला आहे. मात्र आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेले भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी तपोवन वृक्षतोडीसंदर्भात एक ट्वीट केले आहे.
नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव?” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. एकीकडे तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच नितेश राणे यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.




