
जि.प. माजी शिक्षण व अर्थ सभापती ह. भ. प. शरद (दादा) बोरकर यांचा ४ था पुण्यस्मरण दिन साजरा
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती ह. भ. प शरद (दादा)बोरकर यांचा ४ पुण्यस्मरण दिन ३ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी कार्यालय वाटद खंडाळा येथे प्रतीमा पूजन करून करण्यात आला या प्रसंगी तालुका अध्यक्ष विवेकजी सुर्वे, बोरकर दादा यांचे सहकारी विजय धनावडे, प्रकाश नाचरे, अमोल बैकर, निखिल बोरकर, उदय माने, समीर बोरकर आदी उपस्थित होते.
तसेच बोरकर दादा यांचे समाजसेवेचे कार्य सतत सुरु राहण्यासाठी बोरकर दादा कुटुंबीय व मित्रमंडळ यांच्याकडून माहेर संस्था निवळी येथे त्यांच्या आवश्यकतेनुसार भेटवस्तू देण्यात आल्या याप्रसंगी समीर बोरकर, अनिकेत डोंगरे उपस्थित होते




