.सावंतवाडीतील राडाप्रकरणी दोन्ही गटांतील मिळून शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल


मंगळवारी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर गाडी अंगावर घालण्याच्या कारणावरून सावंतवाडी येथे वन विभाग कार्यालय समोरील परिसरात शिवसेना आणि भाजपच्या दोन गटांमध्ये राडा झाला होता.

या राडाप्रकरणी दोन्ही गटांतील मिळून शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी देण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी आणि पोलिसांनी स्वतःहून असे मिळून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजपचे युवानेते विशाल परब यांचे चालक अमरीश यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून धक्काबुक्की, मारहाण आणि गाडी अडवल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकपदाचे उमेदवार संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, अ‍ॅड. नीता सावंत -कविटकर, नगरसेवक पदाचे उमेदवार अजय गोंदावळे तसेच क्लेटस फर्नांडिस,ज्ञानेश्वर पाटकर,प्रफुल्ल गोंदावळे आदी मिळून 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर शिवसेनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटकर यांनीही तक्रार दिली असून. या तक्रारीमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अ‍ॅड. अनिल निरवडेकर, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button