
आमदार किरण सामंत यांची संपत्नीक पाली येथील दत्त साई मंदिर ला भेट
लांजा ,राजापूर साखरपा तालुक्याचे आमदार किरण सामंत साहेब यांनी संपत्नीक पाली येथील दत्त साई मंदिर ला भेट देऊन देवदर्शन घेतले. पाली बस स्थानक येथे वसलेले दत्त साई मंदिर हे किरण सामंत साहेब यांच्या सहकार्यातून उभारलेले आहे. याप्रसंगी देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रीक्षा संघटनेचे अध्यक्ष सागर सावंत, तसेच पप्पा चौगुले, दिलीप सावंत, विजय चव्हाण, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच पाली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




