
’मत्स्य दुष्काळ’ जाहीर करा, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान
पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर १ ऑगस्टपासून सुरू झालेला मासेमारी हंगाम यावर्षी पूर्णपणे निसर्गाच्या लहरीपणामुळे फोल ठरला आहे. नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस, वादळी वार्याचे इशारे व समुद्रातील बदललेल्या वातावरणामुळे नौकांना मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील मच्छीमार संकटात सापडले असून त्यांना तातडीने ’मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात भाजप अल्पसंख्याक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. जिल्ह्यातील मासेमारीची स्थिती पाहता जिल्ह्यात ३ हजार ३८७मच्छीमार नौका (यामध्ये १,९०८ ट्रॉ लींग, ३९० मिनी पर्ससीन व १,०८९ गिलनेटींग) आहेत. १ ऑगस्टपासून या नौकांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही असे म्हटले आहे.
www.konkantoday.com



