
मुंबई–गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सोमवारी सकाळीमच्छी घेऊन जाणारा ट्रक उलटला, मदती ऐवजी मच्छी नेण्या साठी लोकांची धावाधाव
मुंबई–गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सोमवारी सकाळी
मच्छी घेऊन जाणारा एक ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला, आणि यात चालक गंभीर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकलेला होता. मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकांनी मात्र ट्रकमधून बाहेर पडलेली मच्छी नेण्याचा प्रकार घडला
अपघातात जखमी झालेल्या चालकाचं नाव मोहम्मद अशफाक पी (वय 42, केरळ) असं आहे. कुलाब्यातून केरळकडे जाणारा हा मच्छीवाहू ट्रक परशुराम घाट चढत असताना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने तो कडेला पलटी झाला. आवाज होताच परिसरातील वाहनं थांबली, गर्दीही जमली, पण मदत करण्यापेक्षा हातात थेट मच्छी घेऊन धावणारे लोक जास्त दिसत होते.
चालक आतमध्ये अडकून मदत मागत असताना बाहेरच्या नागरिकांनी पापलेट, बांगडा, सुरमई अशा ५ ते १० किलो वजनाच्या मच्छीच्या पेट्या हिसकावून नेण्याची स्पर्धाच लावली. काहींनी दोन हातात भराभर पिशव्या भरल्या, तर काहींनी थेट वाहनात टाकून पसार झाले. हा संपूर्ण प्रकार काही क्षणांत व्हिडिओसुद्धा काढला गेला.
या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालकाला नंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात हलवले.




