
मतदान दिवशी आठवडी बाजार बंद ; लांजा हद्दीतील बाजार १ डिसेंबर रोजी
रत्नागिरी, दि.25 )- मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगरपरिषद व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (ग) मधील क तरतुदीनुसार रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार दि. 1 डिसेंबर 2025 रोजी भरविण्याकरिता जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत.
नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या कार्यक्रमानुसार दि.2 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदान दिवशी रत्नागिरी नगरपरिषद व लांजा नगरपंचायत हद्दीतील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीपणे पार पाडावे. याकरिता बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 (ग) मधील क तरतूदीनुसार रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील नाचणे आठवडा बाजार बंद करण्यास व बाजार व जत्रा अधिनियम 1862 चे कलम 5 नुसार लांजा नगरपंचायत हद्दीतील लांजा आठवडा बाजार दि. 1 डिसेंबर 2025 रोजी भरविण्याकरिता जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेश दिले आहेत.
000




