
महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांनी संधी दिल्यास चिपळूणच्या विकासाला नवी गती देऊ-पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण येथील येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभा संपन्न झाली.
चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आतापर्यंत सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि भविष्यातही करत राहू. विकासाला गती द्यायची असेल, शहराचा विकास साधायचा असेल, तर मतदान कुणाला करायचे याचा विचार नागरिकांनी चिपळूणकरांनी करणे अत्यावश्यक आहे. महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांनी संधी दिल्यास चिपळूणच्या विकासाला नवी गती देऊ, अशी ग्वाही मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.
चिपळूण शहराला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी नागरिकांनी मतदान हे केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर करत, महायुतीच्या उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी देत, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केले.
यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, यशवंत जाधव, संजय कदम, प्रशांत जाधव, सतीश मोरे, रोहन बने, संदीप अहिरे, विनोद झगडे, सतीश मोरे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उमेश सकपाळ तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.




