
कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते “सोशल मिडिया लॅब”चे उद्घाटन
रत्नागिरी पोलीस दलाची नूतन “सोशल मिडिया लॅब” चे उद्घाटन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (भा.पो.से) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी. बी. महामुनी, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
या पोलीस “सोशल मिडिया लॅब” द्वारे सोशल मिडीयावर होणाऱ्या विविध घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यात येणार व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर त्वरित कारवाई करण्यास ही लॅब महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, या लॅबचा उपयोग प्रॉडक्टिव्ह पोलीसिंग साठी करण्यात येणार असून, सोशल मिडिया ट्रेंडचा मागोवा घेऊन भविष्यात घडू शकणाऱ्या गुन्ह्यांचा अंदाज घेण्यासाठीही याचा प्रभावीपणे वापर केला जाणार आहे.
दरम्यान नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक व सतर्कतेने करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सर्वांना केले आहे.




