
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण अखेर आज(२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंहसह अनेक सेलिब्रिटी पोहोचत आहेत. देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत आहे. तिथला हेमा मालिनी यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी व त्यांची लेक ईशा देओल स्मशानभूमीत पोहोचल्या. खचलेल्या हेमा मालिनी यांच्याबरोबर लेक ईशा गाडीत होती. यावेळी हेमा व ईशा भावुक झाल्या.दरम्यान, स्मशानभूमीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींसह सर्वसामान्य चाहत्यांचीही मोठी गर्दी झाली आहे. संजय दत्तसह अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत.अमिताभ बच्चन व त्यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘शोले’मध्ये वीरूची भूमिका करणारे धर्मेंद्र यांनी अगस्त्यबरोबर ‘इक्किस’ या सिनेमात काम केलं आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच धर्मेंद्र यांचे निधन झालं.




