
कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांसह पदाधिकार्यांचे रमेश कदमांशी संधान -लियाकत शाह
कॉंग्रेस प्रदेशस्तरावरून नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी निश्चित झाली होती. त्यानुसार मी निवडणुकीची संपूर्ण तयारी करून अर्ज सुध्दा दाखल केला होता. मात्र शिवसेना शिंदे गटातील सुधीर शिंदे यांना पक्षात घेऊन अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला व मला पर्यायी म्हणून ठेवले, असा गौप्यस्फोट करत कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह पक्षातील काही पदाधिकार्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्याशी संधान साधून संगनमताने माझा घात केल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी पत्रकार परिषदेत केला. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपण कॉंग्रेस तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून नगराध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे देखिल त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी एकाचवेळी सुधीर शिंदे व लियाकत शाह यांना एबी फॉर्म दिल्याने गोंधळ झाला. त्यानंतर सुधीर शिंदे यांच्यावर माघार घेण्याचे प्रयत्न केले. मात्र शिंदे यांनी माघार न घेतल्यान लियाकत शाह यांची कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर असलेली उमेदवारी बाद झाली. या घडामोडीमुळे कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.www.konkantoday.com




