एकदा शब्द दिला तर परिणामांची पर्वा करत नाही

रमेश कदम यांना ठाम पाठिंबा; भास्कर जाधव यांचा शब्द

चिपळूण : नगर परिषद निवडणुकीच्या राजकीय घडामोडींमध्ये शनिवारी आमदार भास्कर जाधवांनी महत्त्वाचा खुलासा करत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली. एकदा मी शब्द दिला, तर त्याचे परिणाम काय होतील, याची मी कधीच पर्वा करत नाही, रमेश कदम यांच्या पाठीशी मी ठाम आहे, असे सांगत त्यांनी आघाडी चर्चांचे पडसाद, पक्षातील घडामोडी आणि रमेश कदम यांच्यासोबत झालेल्या समन्वयाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या या भूमिकेमुळे चिपळूणच्या राजकीय वातावरणात नव्याने खळबळ उडाली आहे.

नगर परिषद निवडणुकीत महत्त्वाच्या चर्चांचा गोंधळ, आघाडीचे राजकारण आणि पक्षांतील अंतर्गत मतभेद याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार भास्कर जाधव यांनी आज सविस्तर माहिती देत परिस्थितीवर मोठा खुलासा केला. शनिवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात शरद पवार गट राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद झाली.

भास्कर जाधव म्हणाले,
नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गपासून चिपळूणपर्यंतची जबाबदारी पक्षाने माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर सोपवली होती. मात्र निर्णय काही होत नव्हता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता कदम व त्यांचे सहकारी माझ्याकडे येत होते. ‘या प्रकरणात लक्ष घाला’ अशी विनंती करत होते. दोन-तीन वेळा आग्रह झाल्यावर मी हस्तक्षेप केला.

जाधव यांनी सांगितले की काही काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः त्यांच्या संपर्कात आले आणि ही निवडणूक आघाडीने लढवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

त्या दरम्यान रमेशभाई कदम यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत बसून नगरसेवक पदांच्या जागांबाबत बोलणी सुरू केली,असे त्यांनी सांगितले.

जाधव पुढे म्हणाले, चर्चा सुरू असतानाच मी सोलापूरला गेलो. दुसऱ्या दिवशी अचानक चर्चा थांबवली गेल्याची माहिती मिळाली. काय घडलं हे मला कळलं नाही. तरीही मी एकदा शब्द दिला की मागे हटत नाही. फायदा–तोटा मी पाहत नाही. पक्षाच्या हितासाठी जे जागा मिळवल्या त्या योग्य आहेत.

ते म्हणाले की, आघाडीचा दरवाजा अजूनही बंद नाही.
आजही काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार आमच्यासोबत आले, तर चिपळूणचे चित्र पूर्णपणे बदलेल. पक्षहित यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाधव यांनी जाहीर केले की,
२५ नोव्हेंबरनंतर मी स्वतः रमेश कदम यांच्या उमेदवारीसाठी तसेच आमच्या आघाडीच्या नगरसेवक उमेदवारांसाठी प्रचारात उतरू.

या प्रश्नावर जाधव म्हणाले,
लियाकत शहा यांनी आधीच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच मी रमेश कदम यांच्याशी जागा वाटपासंदर्भात बोलणी केली.

पत्रकार परिषदेत रमेश कदम यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताच निर्णय होत नव्हता. म्हणून मी थेट भास्करशेठ यांच्याकडे गेलो, ‘तुम्हीच लक्ष द्या’, असे सांगितले. त्यानंतर गंभीर चर्चा झाली आणि आमची आघाडी निश्चित झाली. आम्हाला यश मिळेल, हा विश्वास आहे.
………………………
*एकदा शब्द दिला तर परिणामांची पर्वा करत नाही

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button