
लांजा नगरपंचायतीसाठी १२ उमेदवारी अर्ज मागे
नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी ५७ उमेदवार रिंगणात
लांजा : नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या चार उमेदवारांपैकी एक, तर नगरसेवक पदासाठीच्या ६८ उमेदवारांपैकी ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी आज मागे घेतले. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी ५७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. असे असले तरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही तिरंगीच होणार हे स्पष्ट झाले आहे.
लांजा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक पदासाठी ८० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले होते. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या छाननी मध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या सात पैकी तीन तर नगरसेवक पदासाठीच्या ८० उमेदवारांपैकी १२ उमेदवारी अर्ज हे बाद ठरवण्यात आले होते.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठीचा एक, तर नगरसेवक पदासाठी ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीकडून सावली सुनील कुरूप या निवडणूक रिंगणात आहेत तर काँग्रेस शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी या महाविकास आघाडी कडून पूर्वा मुळे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे माजी नगरसेवक संजय यादव यांच्या पत्नी प्रियांका यादव यांनी देखील अपक्षपणे निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहे.
दरम्यान , आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी चेतना भालचंद्र कांबळे तर तर नगरसेवक पदासाठी भालचंद्र कांबळे (प्रभाग १४), सुजित भुर्के (प्रभाग ८), मुग्धा चांदोरकर (प्रभाग १), प्रमोद कुरूप (प्रभाग ६), सुहेल मापारी (प्रभाग ९), स्मिता मांडवकर प्रभाग ३, मंगेश लांजेकर (प्रभाग ८), अशोक कातकर- प्रभाग ५, फरजीन नाईक (प्रभाग १३), मेधा सुर्वे (प्रभाग १७), केशव गुरव (प्रभाग १६) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अपक्षांच्या बंडखोरीचा फटका कोणाला?
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारीने आपले अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवशी येथील बहुसंख्य उमेदवार आपले अर्ज मागे येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अखेर पर्यंत ५७ अपक्षांनी आपली उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्याचा फटका नेमका कोणाला बसणार ? हे आगामी काळात दिसून येणार आहे.




