
मंडणगड पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था
स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होऊन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती राज्य व केंद्रशासनाचे. विविध पुरस्कार मिळवत असताना शहरातील विविध प्रशासकीय यंत्रणांची कार्यालये मात्र यास अपवाद ठरली आहेत. दस्तुरखुद्द मंडणगड पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर असलेल्या स्वच्छतागृहाची स्वच्छतेअभावी दुरावस्था झाली आहे.
पंचायत समितीचे आवार कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरिकांनी नेहमीच गजबजलेले असते. या कार्यालयाच्या बाहेरच नागरिक व अधिकार्यांच्या वापरासाठी असलेले स्वच्छतागृह गेले कित्येक महिने स्वच्छरोभभानी कचरा व दुर्गंधीच्या विळख्यात अडकले आहे. मात्र पंचायत समिती प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.
www.konkantoday.com




