
वैभव खेडेकर यांच्या पत्नीची उमेदवारी मागे, खेडमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात
खेड नगर परिषद निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यानी पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत नवा डाव टाकल्याने महायुतीतील राजकारण ढवळून निघाले होते. येंथील शिवसेना-भाजप महायुतीतील तणावही वाढला होता. अखेर शिवसेना नेते रामदास कदम व वैभव खेडेकर यांच्यातील दिलजमाईने महायुतीतील अंतर्गत धुसफूस संपुष्टात आली आहे. रामदास कदम यांची येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी गुरुवारी भेट घेतल्याने महायुतीत मिलाफ होवून राजकीय तर्कवितकांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
www.konkantoday.com




