
डेरवण येथील वालवलकर रूग्णालयात चार यशस्वी ऍन्युरिझम शस्त्रक्रिया
वालवलकर रुग्णालय आणि ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यूरोनर्जरी विभागाने अवघ्या चार आठवड्यांच्या कालावधीत चार गुंतागुंतीच्या मेंदूतील ऍन्युरिझम शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून आपल्या दैनंदिन जीवनात परतले आहेत. ही कामगिरी कोकणातील अत्याधुनिक मेंदू शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात एक मोवा टप्पा ठरली आहे.
यासर्व शस्त्रक्रियेमध्ये न्युरोनॅव्हिगेशन या अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अतिशय अचूक मायक्रोसर्जिकल तंत्राचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन शल्यचिकित्सकांना मिलीमीटरच्या अचूकतेने काम करता येते. या सर्व शस्त्रक्रियांचे नेतृत्व प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी केले. तर भूलतज्ज्ञ डॉ. लीना ठाकूर व त्यांच्या टीमने भूल व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
मेंदूतील रक्तवाहिन्या कमजोर होऊन फुगण्यामुळे ऍन्युरिझम तयार होतो, जो फुटल्यास मेंदूत रक्त रक्तस्त्राव होऊन जीवघेणा प्रसंग उद्भवू शकतो. अचानक होणारी तीव्र डोकेदुखी किंवा उलट्या यांसारखी लक्षणे कोणत्याही वयोगटात गंभीरतेने घ्यावीत, कारण लवकर निदान हेच उपचारातीज यशाचे गमक आहे.www.konkantoday.com




