
कामाने गती न घेतल्याने गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम थंडावले
गुहागर गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या झिरो नंबर पासून ते ८०० मीटर पर्वतच्या भूसंपादन प्रक्रिया अंतर्गत श्रताधिकार्यांनी जागा हस्तांतरणातून सर्व दुकाने पाडावयास लावली. मात्र ३० ऑक्टोबरनंतर झालेल्या या कारवाईनंतर पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे केवळ प्रशासकीय अनास्थेपोटी यानंतर कार्यवाहीने गती न घेतल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. जागा ताब्यात मिळूही राष्ट्रीय महामार्गाला ठेकेदारच सापडत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे
शहरातील मुख्य नाक्यापासून ते चौदाशे मीटर पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवादा जाहीर झाल्यानंतर संबंधित जागामालकांना मिळणार्या मोबदल्याबाबतची नोटीस देऊन कागदपत्रे सादर करावयाच्या सूचना केल्या आहेत ज्याच कागदपत्र योग्य आहेत त्यांना जमिनीचा मोबदली मिळण्यास सुरुवात झाली आहे. मातच जमा बाला करण्याबाबतची कोणतीही पूर्व नोटीस न देता प्रांताधिकार्यांनी ३० ऑक्टोबर रोजी शहरात जागा राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात देण्यासाठीचे स्टिंग ऑपरेशन’ केले. जमीन मोबदल्याची रक्कम मिळवण्यासाठी कागदपत्र सादर करताना आपण आपल्या जमिनीचा ताबा देत असल्याची लेखी स्वरुपात कबुली दिली आहे. यामुळेच प्रांताधिकारी यांनी थेट जागा खाली करण्याची कार्यवाही केली.www.konkantoday.com




