
बेवारस मयताच्या नातेवाईकांचा शोध
रत्नागिरी, दि. 21 ):- बेवारस मयत अशोक रॉय, वय 74 वर्षे, मूळ राज्य पश्चिम बंगाल यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे.
मयत कै. रॉय हे सध्या चिपळूण तालुक्यातील अलोरे – शिरगाव येथील कोयना प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील मुदतबाह्य रेकॉर्डची कागदपत्रे वर्गीकरण करुन रद्दी म्हणून विकत घेण्याचे काम करायचे. ते एकटेच राहावयास होते. आजारी पडल्याने उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे उपचाराकरीता दाखल होते. 18 ऑगस्ट 2025 रोजी अधिक उपचारासाठी कामथे येथून शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे घेवून जाताना प्रवासादरम्याने ते मृत झाले. त्यांचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांनी केलेले आहे. फुफ्फुसात पाणी होवून न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मयताचा गावा कडील पूर्ण पत्ता समजून येत नसून त्यांच्या नातेवाईकांच्या तपासाकरीता कोणतीही माहिती मिळालेली नाही. मयताचे प्रेताचे दफन विधी रत्नागिरी नगरपरिषद यांच्यामार्फत करण्यात आले आहे. सदर मयत व्यक्तीचे नातेवाईक असल्यास त्यांनी ग्रेड पोलीस पोलीस उप निरीक्षक अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.




