
हिंसाचाराचे समर्थन करणार नाही -माजी खा. हुसेनभाई दलवाई
मी गांधीवादी विचारसरणीचा आहे, त्यामुळे हिंसाचाराचे कदापी समर्थन करणार नाही. जो कोणी हिंसा करतो तो आतंकवादीच ठरतो असे माझे ठाम मत आहे, अशी स्पष्ट भूमिका कॉंग्रेस नेते माजी खासदार श्री. हुसेनभाई दलवाई यांनी एका दैनिकाशी बोलताना व्यक्त केली. काश्मीरमध्ये स्थानिक जनतेवर अन्याय होतोय, तरुणांवर जुलूम केला जातो, ३७० कलम हटवण्यात आल्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता आहे, अशी भूमिका हुसेनभाई दलवाई यांनी मांडल्यानंतर भाजपाने त्यांना लक्ष्य केले. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, मी हिंसेचे अजिबात समर्थन करीत नाही. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद्यांचा हात आहे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र मी हिंसाचाराचे समर्थन करत नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. काश्मीरमध्ये हिंदु -मुस्लीम आणि सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लोक चळवळ राबवावी, असे स्पष्ट मतही त्यांनी मांडले. भाजपाचे बहुतेक सर्व मंत्री हे संविधान मानत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
www.konkantoday.com




