
दापाेली सध्या गाेठली, दापाेलीचा पारा 8.5 अंश सेल्सिअसवर प्रतिमहाबळेश्वर दापाेली सध्या अक्षरशः गाेठली आहे.
महाबळेश्वर, पाचगणीसारख्या थंड हिलस्टेशनप्रमाणे दापाेलीचा पारा तब्बल 8.5 अंशावर घसरला. या वर्षातील ही सर्वाधिक कमी तापमानाची नाेंद ठरली आहे.
दुसरीकडे कमाल तापमान 30.6 अंश सेल्सिअस इतके नाेंदले असून किमान व कमाल तापमानात तब्बल 22 अंशांचे अंतर निर्माण झाले आहे. दिवसा हलकी ऊब जाणवत असली तरी सायंकाळपासून पहाटे व रात्री हवेचा थंडावा गारठवणारा ठरत आहे. दापाेलीत पर्यटकांची वाढती गर्दी, स्वच्छ आकाश आणि समुद्रकिनाèयाकडे वाहणाèया थंड वाèयामुळे तापमानात अचानक घट झाली असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
पहाटेच्या वेळेस दाट धुके पसरत असून ग्रामीण भागात तसेच शहर परिसरात तापमान आणखी कमी जाणवत आहे. सकाळी शाळेत जाणाèया मुलांसह शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांना उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे.
www.konkantoday.com




