
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारीची माळ न मागताच सुधीर शिंदेंच्या गळ्यात पडणार?
शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने प्रचंड अस्वस्थ झालेल्या माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांच्यामुळे चिपळूणच्या नगर परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्षाकडून न मागताच त्यांनी दाखल केलेला नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी चक्क ’टर्निंग पाॅईंट’ ठरला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले लियाकत शाह यांचा एक अर्ज छाननीत अवैध झाल्याने सध्यातरी श्री. शिंदे हेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी माघार घेतल्यासच श्री. शाह हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून सुधीर शिंदे यांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र, सुधीर शिंदे यांनी अजून तरी भूमिका स्पष्ट केली नसल्याने काँग्रेससमाेर नवा पेच निर्माण झाला आहे.
चिपळूण नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्ष सुरूवातीपासून आग्रही राहिला आहे. मित्र पक्षाकडून याबाबत काेणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पक्षाने नगर पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्धार केला.www.konkantoday.com




