कोकण रेल्वेमध्ये दागिने चोरणार्‍या चौघांची टोळी गजाआड


कोकण रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या दागिने चोरी प्रकरणात सहभाग असलेल्या चौघांना रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) गजाआड केले. अटकेतील संशयितांकडून ५० लाख रुपयांचे चोरीतील सोन्याचे दागिने आणि ३४ हजार ५०० रुपयांच्या रोकडसह चार मोबाईल जप्त केले. चौघांच्या अटकेमुळे अन्य चोर्‍यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. आरपीएफच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या दागिने चोरी प्रकरणात सहभागी असलेले संशयित मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून मडगावच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती आरपीएफला मिळाली. त्यानुसार दक्षिण रेल्वेचे आयजी-कम-पीसीएससी अरुल ज्योती यांनी मडगाव येथे कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेचे आयजी-कम- पीसीएससी अभिषेक कुमार, मुख्यालयाचे एएससी/सी अँड आय जुबीर खान पठाण यांना सतर्क केले.
चारही संशयित मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये सुरतकलला चढले. या संशयितांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून एक विशेष पथक तत्काळ तयार करण्यात आले. एक्स्प्रेसच्या पुढच्या आणि मागच्या जनरल डब्यांमध्ये पथकाने सापळा रचला. यातील काही जण टीटीई गणवेशात होते, काही फेरीवाल्यांच्या वेशात होते आणि काही नियमित प्रवासी म्हणून प्रवास करत होते.
मडगाव रेल्वे स्थानकात मत्स्यगंधा एक्सप्रेसचे आगमन होताच पथकाने चारही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. चौघांचीही झडती घेण्यात आली असता ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ३४ हजार ५०० रुपयांची रोकड आणि चार मोबाईल जप्त केले. चारही संशयितांना पुढील चौकशीसाठी दक्षिण रेल्वेच्या आरपीएफ/एमएक्यूकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button