
दापोली तालुक्यातील करंजाळी येथे ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडल्याने एका तरुणाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील करंजाळी येथे टॅक्टरवरुन पडून ट्रॉलीखाली आल्याने कन्हैया लकडू वनवासी या ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजेश कमला वनवासी (३६, सराई मरेज हदिया, मूळ प्रयागराज, उत्तरप्रदेश, सध्या करंजाळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद रामबहादूर नंदलाल वनवासी यांनी दापोली पोलिसात दिली. त्यानुसार राजेश वनवासी हा चिरे भरलेला टॅक्टर ट्रॉलीसह घेऊन जात असताना कच्चा रस्ता व तीव्र उताराकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवत होता.
यामुळे ट्रॅक्टरमध्ये त्याच्या शेजारी बसलेला कन्हैया वनवासी ट्रॅक्टरमधून खाली पडून ट्रॉलीच्या चाकाखाली आला व यात तो मृत झाला. त्यानुसार ट्रॅक्टर चालक राजेश वनवासी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com




