
रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे गोवा बनावटीची दारू बाळगणार्या संशयितावर गुन्हा
रत्नागिरी शहरातील खालची आळी येथे गोवा बनावटीची दारू बाळगणार्या संशयितावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. राजू सोमवंशी (२३, रा. मुरुगवाडा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ४,४८० रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य हस्तगत केले.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून अवैध दारू विक्रीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी पोलिसांना शहरातील खालची आळी येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतुक होणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खालची आळी येथील बंद पडलेल्या बर्फ फॅक्टरीलगतच्या भागात छापा टाकून कारवाई केली. यावेळी संशयित राजू सोमवंशी याच्या ताब्यात पोलिसांना गोवा आले. बनावटीची दारू असल्याचे आढळून आले.
www.konkantoday.com




