
भंडारी समाजाचे नेते राजीव किर आज शिंदे शिवसेनेकडून अर्ज भरणार
भारतीय जनता पक्षाशी जवळीक असलेले व भंडारी समाजाचे नेते राजीव किर रत्नागिरी शिवसेना शिंदे गटातर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून आज (सोमवार ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रत्नागिरी भंडारी समाजाचे तालुका प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या किर यांचा समाजात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये दांडगा संपर्क असून, प्रभागातही त्यांची चांगली ओळख आहे.
आज सकाळी 11 वाजता ते रत्नागिरी नगरपरिषद कार्यालयात अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. किर यांना उमेदवारी देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यंतरी नाराज असलेल्या भंडारी समाजाला जवळ करण्यात यश मिळवल्याचे बोलले जात आहे




