
माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे कुटुंब पक्षावर नाराज, अन्य पक्षांकडून उमेदवारी भरणार
माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे कुटुंब आता शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे कळते त्यामुळे या कुटुंबाने शिंदे शिवसेनेला रामराम ठोकल्याचे कळते आज त्यानी स्टेटसवर आपण अन्य पक्षाकडून अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे उमेश शेट्ये यांचे पुत्र केतन शेट्ये प्रभाग क्रमांक चार ब कोकण नगर मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत तर उमेश शेट्ये यांच्या पत्नी उज्वला शेट्ये या प्रभात क्रमांक १३ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्याकडून निवडणूक लढवणार असल्याचे कळते तसे त्यानी आपल्या स्टेटस मध्ये म्हटले आहे




