
महायुतीचे रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौ शिल्पा सुर्वे यांच्या नावाची घोषणा
रत्नागिरी नगर परिषदेच्या महायुती व शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार याची गेले काही दिवस सर्वांना उत्कंठा लागून होती मात्र पालकमंत्री उदय सामंत यांनी रात्री उशिरा रत्नागिरी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ शिल्पा सुर्वे यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे
शिवसेनेच्या माजी नगरसेविका या शिल्पा सुर्वे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहेत
महा युतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा सुर्वे यांचे नाव काल रात्री घोषित करण्यात आले या नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत माजी नगरसेविका स्मितल पावसकर व ज्येष्ठ नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या पत्नी सौ समृद्धी मयेकर या स्पर्धेत होत्या मात्र पालक मंत्री उदय सामंत यांनी शेवटी सौ शिल्पा सुर्वे यांच्या नावाची घोषणा केली
आता महायुतीच्या वतीने शिल्पा सुर्वे व महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवानी सावंत माने यांच्यात खरी लढत रंगणार आहे मात्र नगराध्यक्षाची निवड जनतेतून होणार असल्याने या रंगतीला महत्त्व प्राप्त झाले आहे



