
रत्नागिरी शहरातील रामआळी भागातील डांबरीकरणाचे काम पूर्ण
रत्नागिरी वासियांची खड्डे मय रस्त्यातून हळूहळू सुटका होत असल्याचे दिसत आहे
पाऊस थांबल्यानंतर तात्काळ कामे हाती घेऊन येत्या दोन महिन्यात रत्नागिरी खड्डेमुक्त करण्यात येईल असे आश्वासन रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले होते. त्यातच नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवारांना रस्त्याच्या प्रश्नावरून मतदारांना सामोरे जावे लागणार होते या सर्वाचा विचार करून रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला असून, रत्नागिरी शहरातील प्रमुख अशा राम आळीतील रस्ते डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे.
सातत्याने होणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यात परतीचा पाऊस लांबल्याने रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे कामही लांबणीवर पडले होते




