
शिवसेनेची ६ जणांची दुसरी यादी जाहीर, नगराध्यक्षांचे नाव उद्या जाहीर होणार
रत्नागिरीत शिंदे शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी ६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात संतोष कीर (प्रभाग १४ ब), सौ. जागृती पिलणकर (प्रभाग १२, अ), सौ. सायली पाटील (प्रभाग ९, ब), नाहिदा सोलकर (प्रभाग ८, अ), इल्यास खोपेकर (प्रभाग ४, ब), सौ. प्रिती सुर्वे (प्रभाग ३, अ) यांचा समावेश आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळे उत्सुकता कायम आहे. तसेच भाजपला किती जागा देणार याचाही निर्णय सोमवारी सकाळपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.




