
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा!,
मुंबई :- राज्य शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने १० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटी , महाराष्ट्र शासन मार्फत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे या परिपत्रकात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी / निमसरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र राहणार आहेत.




