
सोनवी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी महामार्ग बंद करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांच्यात तीव्र नाराजी
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरनजिक सोनवी पुलाचे काम गेली पाच वर्षे थंडावले असून कंत्राटदाराने पुलाचे काम करताना कोणतीही सुरक्षिततेचे उपाय केले नव्हते. या पुलाच्या पूर्णत्वासाठी अजून दीड वर्ष लागण्याची शक्यता असून आता या पुलावर गर्डर चढविण्यासाठी सलग १४ दिवस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सोनवी चौक येथे दिवसभरात १०-१२ तास बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. असे कंपनीने जाहीर केले आहे. सोनवी चौक येथे १३ नोव्हें. ते २६ नोव्हें. या दरम्याने सकाळी १० ते १ दुपारी ३ ते ५ आणि रात्री १० ते पहाटे ३ या कालावधीसाठी हा चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा फलक लावला गेला आहे. यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हा निर्णय घेताना व्यापारी वर्ग, संस्थाचालक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे प्रतिनिधी व परिसरातील ग्रामपंचायती यांना एकत्र न बोलवताच परस्पर निर्णय जाहीर केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या कामासाठी क्रेन उपलब्ध झाली नसताना हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून योग्य तो पर्याय काढावा अशी नागरिकांच्यात मागणी होत आहे.
www.konkantoday.com




