
रत्नागिरी जवळील गणपतीपुळे समुद्रात तीन जण बुडाले एकाचा मृत्यू दोन जणांना वाचवण्यात यश
रत्नागिरी जवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर परत आज दुर्घटना घडली समुद्रात मौज मजा करण्यासाठी उतरलेले तिघेजण समुद्रात बुडाले
यातील अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) या तरुणाचा मृत्यू झाला असून विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४, दोघेही रा. भिवंडी) यांना समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून वाचवले. ही घटना शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या महिन्याभरात गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत गणपतीपुळे समुद्रकिनारा सुरक्षित राहावा यासाठी नुकतीच प्रशासनाने बैठकही घेतली होती मात्र पर्यटक बुडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हा किनारा आता असुरक्षित बनत चालला आहे




