
साेनवी पुलाच्या गर्डर कामामुळे मुंबई-गाेवा मार्ग संगमेश्वरात बंद, 13 ते 26 नाेव्हेंबर या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू
संगमेश्वर येथील साेनवी पुलाच्या गर्डर बसविण्याचे काम सुरू झाल्यामुळे दि. 13 ते 26 नाेव्हेंबर या कालावधीत मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात वाहनचालकांनी काेळंबे-काेसुंब मार्गे संगमेश्वर या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
साेनवी पुलाजवळील कामामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गाेवा महामार्गावरून जाणाèया वाहनांना काेळंबे, काेसुंब, संगमेश्वर हा मार्ग वापरणे भाग पडणार आहे. या काळात वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाेलीस विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त नियाेजन सुरू केले आहे. बुरंबी -मुचरी- कळंबस्ते या जिल्हा प्रमुख मार्गाचे काम पूर्ण झाले असते तर छाेट्या वाहनचालकांना माेठी साेय झाली असती, असा जनतेचा सूर आहे. परंतु लाेकप्रतिनिदींच्या उदासीनतेमुळे हा मार्ग अद्यापही दयनीय अवस्थेत आहे.www.konkantoday.com



